Scholarships
“देवांशी फॉउंडेशन Scholarships”
“देवांशी फॉउंडेशन” हे भारताचे दिवंगत राष्ट्रपती आणि भारताच्या missile technology चे जनक Dr. डॉ. ए पी जे अब्दुल कलाम ह्यांच्या “I have wings, I will fly” ह्या संकल्पनेला समोर ठेवून विद्यार्थ्याची विज्ञान (Science), तंत्रज्ञान (Technology) आणि वाणिज्य (Commerce) ह्या विषयात रुची वाढवून, यशस्वी तरुण तरुणी कसे तयार होतील ह्या उद्देशाने २०२२-२३ ह्या शैक्षणिक वर्षांसाठी अभ्यासू आणि मेहनती विद्यार्थ्यांसाठी scholarship देऊ इच्छित आहे.
१. श्री नरेश अनंत म्हात्रे , Science Scholarship - ३ scholarships - Rs .५०००.
पात्रता - १२ वि Science मध्ये ७० % पेक्षा जास्त गुण - पहिले ३ विद्यार्थी .
२. श्रीमती . जयवंती नरेश म्हात्रे - मॅट्रिक Scholarship - ३ Scholarships - Rs . ३०००
पात्रता : १० वि मध्ये ७० % पेक्षा जास्त गुण - पहिले ३ विद्यार्थी.
३. श्रीमती . जयवंती नरेश म्हात्रे – HSC- Science- Motivation Scholarship - ३ Scholarships - Rs . २०००
पात्रता : १० वि मध्ये ५०% पेक्षा कमी आणि १२ वि मध्ये ६० % पेक्षा जास्त गुण - पहिले ३ विद्यार्थी.( Science Scholarship पात्र विद्यार्थी वगळून )
४. श्री . नरेश अनंत म्हात्रे HSC Maths Scholarship - ३ scholarship - Rs २०००.
पात्रता : १२ वि Science/Arts/Commerce - Mathematics मध्ये ७० % पेक्षा जास्त गुण. पहिले ३ विद्यार्थी.
५. श्रीमती . जयवंती नरेश म्हात्रे –HSC- English Scholarship - ३ Scholarships - Rs .२०००
पात्रता : १२ वि इंग्लिश ह्या विषयात ७० % पेक्षा जास्त गुण - पहिले ३ विद्यार्थी.
६. श्रीमती . जयवंती नरेश म्हात्रे –SSC- Motivation Scholarship - ३ Scholarships - Rs . २०००
पात्रता : ८ वि मध्ये ५०% पेक्षा कमी आणि १०वि मध्ये ७० % पेक्षा जास्त गुण - पहिले ३ विद्यार्थी.
७. श्री नरेश अनंत म्हात्रे , Commerce Scholarship - ३ scholarships - Rs . ४०००.
पात्रता - १२ वि Commerce मध्ये ७० % पेक्षा जास्त गुण - पहिले ३ विद्यार्थी .
अटी:
· विद्यार्थी पहिल्या attempt मध्ये SSC आणि HSC पास असावा.
· वरील सर्व Scholarships साठी विद्यार्थी हा “ कर्मवीर भाऊराव पाटील - K B Patil विद्यालय पिरकोन “ किंवा “रामचंद्र म्हात्रे विद्यालय आवरे “ ह्या विद्यालयामधून २०२२-२३ ह्या शैक्षणिक वर्षात १० वि किंवा १२ वि मध्ये शिकलेला असावा.
· एका विद्यार्थ्याला फक्त एकच scholarship प्रदान करण्यात येईल. Scholarship चा उद्देश हा जास्तीत जास्त पात्र विद्यार्थ्यांना लाभ कसा होईल हा आहे .
· इच्छुक विद्यार्थ्यानी खालील कागदपत्रांसह संपर्क साधावा
o १२ वि चे मार्कशीट
o ११ वि मार्कशीट (आवश्यकता भासल्यास)
o १० वि चे मार्कशीट
o ९ वि चे मार्कशीट (आवश्यकता भासल्यास)
o ८ वि चे मार्कशीट
o राशन कार्ड.
o आधार कार्ड
o बँक अकाउंट : विद्यार्थ्यांच्या नावाने बँक अकाउंट ची माहिती (बँक पासबुक आणि cancelled चेक ची प्रत)
o शाळेचे विद्यार्थी असल्याचा दाखला ( आवश्यकता भासल्यास)
· अर्जाची मुदत :
o १. १० विच्या scholarships : १० वि SSC च्या निकालानंतर १ महिन्या पर्यंत .
o २. १२ विच्या scholarships : १२ वि HSC च्या निकालानंतर १ महिन्या पर्यंत .
· शैक्षणिक वर्ष : २०२२-२३ . SSC आणि HSC मार्च २०२३ मध्ये पास होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी .
· scholarship फक्त पात्र विद्यार्थ्याना प्रदान करण्यात येईल .
· ज्या scholarship साठी पात्र विद्यार्थी नसेल त्या scholarship चे प्रदान करण्यात येणार नाही.
· वरील नियम फक्त २०२२-२३ ह्या शैक्षणिक सालासाठीच आहेत . २०२४ साठी नवीन नियम असतील.
· सर्व Scholarship चे वितरण हे “देवांशी फौंडेशन” च्या कमिटी च्या निर्णयानुसार होतील.
· संपर्क साधा : info@devanshifoundation.com Whatsapp contact : +919702687582
Scholarship चा हेतू
देवांशी फॉउंडेशन scholarship चा हेतू हा गोवठणे गावातील विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या अभ्यासू वृत्तीला आणखी वाव देऊन त्यांना त्यांच्या पुढील भविष्यासाठी बळ देऊन तयार करणे आहे .
सध्या नवी मुंबई हा परिसर IT पार्क ने व्यापला आहे आणि IT क्षेत्रात नोकरी साठी नवीन नवीन संधी उपलब्ध आहेत. तसेच नवी मुंबई एअरपोर्ट, JNPT पोर्ट ,warehouses आणि नवी मुंबई नजीकचे IT आणि finance पार्क ह्या परिसराच्या अर्थकारणात खूप मोठी भूमिका बजावून रोजगाराच्या नवनवीन संधी उपलब्ध करून देणार आहेत. देवांशी फॉउंडेशन Scholarship चा उद्देश मुलांच्या बौद्धिक क्षमतेला पुढे नेवून त्यांना नवीन opportunities साठी तयार करणे हा आहे .
१. श्री नरेश अनंत म्हात्रे , Science Scholarship - ३ scholarships - Rs .५०००.
पात्रता - १२ वि Science मध्ये ७० % पेक्षा जास्त गुण - पहिले ३ विद्यार्थी .
ह्या Scholarship चा उद्देश हा विद्यार्थ्यानमध्ये Science ( Physics, Chemistry, Biology , Mathematics) ह्या विषयाची रुची वाढवणे हा असून त्यांना Medical, IT, MBA- Finance, Supply Chain Management, Biotechnology and life sciences , विविध क्षेत्रातल्या Research & Development ह्या सारख्या Science ला अग्रगण्य महत्व देणार्या क्षेत्रांमध्ये करिअर करण्यासाठी तयार करणे हा आहे.
२. श्रीमती . जयवंती नरेश म्हात्रे - The First Milestone Scholarship - ३ Scholarships - Rs . ३०००
पात्रता : १० वि मध्ये ७० % पेक्षा जास्त गुण - पहिले ३ विद्यार्थी.
१० वि हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातला पहिला मैलाचा दगड – The First Milestone. ह्या scholarship चा उद्देश हा विद्यार्थ्याना त्या milestone चे उद्दिष्ट यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी प्रोत्साहित करून पुढील वाटचालीसाठी प्रेरणा देणे हा आहे.
३. श्रीमती . जयवंती नरेश म्हात्रे – HSC- Science- Motivation Scholarship - ३ Scholarships - Rs . २०००
पात्रता : १० वि मध्ये ५०% पेक्षा कमी आणि १२ वि Scienceमध्ये ६० % पेक्षा जास्त गुण - पहिले ३ विद्यार्थी.( Science Scholarship पात्र विद्यार्थी वगळून )
ह्या scholarship चा उद्देश हा विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या उपजत बुद्धीला प्रेरणा देऊन मागच्या गोष्टींचा विचार न करता भविष्या कडे मोठ्या धाडसाने पाहून यश मिळवण्यासाठी तयार करणे आहे. देवांशी फौंडेशन चा विश्वास आहे कि अथक मेहनत आणि प्रयत्नांनि, १० वि पर्यंत ५० टक्के पेक्षा कमी गुणांनी उत्तीर्ण होणारे विद्यार्थी पुढील २ वर्षे मेहनत करून १२ वि मध्ये यशस्वी होऊ शकतात .
४. श्री . नरेश अनंत म्हात्रे HSC Maths Scholarship - ३ scholarship - Rs २०००.
पात्रता : १२ वि Science/Arts/Commerce Mathematics मध्ये ७० % पेक्षा जास्त गुण. पहिले ३ विद्यार्थी.
ह्या Scholarship चा उद्देश हा विद्यार्थ्यानमध्ये Mathematics ह्या विषयाची रुची वाढवणे हा असून त्यांना IT, Finance, Supply Chain Management, विविध क्षेत्रातल्या Reaserch & Development ह्या सारख्या Mathematics ला अग्रगण्य महत्व देणार्या क्षेत्रांमध्ये करिअर करण्यासाठी तयार करणे हा आहे.
५. श्रीमती . जयवंती नरेश म्हात्रे –HSC- English Scholarship - ३ Scholarships - Rs .२०००
पात्रता : १२ वि इंग्लिश ह्या विषयात ७० % पेक्षा जास्त गुण - पहिले ३ विद्यार्थी.
इंग्लिश हि जागतिक व्यवहाराची भाषा आहे . ह्या scholarship चा उद्देश हा विद्यार्थ्यांमध्ये English भाषेची रुची वाढवणे आणि त्यांची English reading, writing, speaking आणि listening capability वाढवणे हा आहे.
६. श्रीमती . जयवंती नरेश म्हात्रे –SSC- Motivation Scholarship - ३ Scholarships - Rs . २०००
पात्रता : ८ वि मध्ये ५०% पेक्षा कमी आणि १०वि मध्ये ७० % पेक्षा जास्त गुण - पहिले ३ विद्यार्थी.
ह्या scholarship चा उद्देश हा विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या उपजत बुद्धीला प्रेरणा देऊन मागच्या गोष्टींचा विचार न करता भविष्या कडे मोठ्या धाडसाने पाहून यश मिळवण्यासाठी तयार करणे आहे. देवांशी फौंडेशन चा विश्वास आहे कि अथक मेहनत आणि प्रयत्नांनि, ८ वि पर्यंत ५० टक्के पेक्षा कमी गुणांनी उत्तीर्ण होणारे विद्यार्थी पुढील २ वर्षे मेहनत करून १० वि मध्ये यशस्वी होऊ शकतात .
७. श्री नरेश अनंत म्हात्रे , Commerce Scholarship - ३ scholarships - Rs . ४०००.
पात्रता - १२ वि Commerce मध्ये ७० % पेक्षा जास्त गुण - पहिले ३ विद्यार्थी .
ह्या Scholarship चा उद्देश हा विद्यार्थ्यानमध्ये Commerce म्हणजे वाणिज्य ह्या विषयाची रुची वाढवून त्यांना वाणिज्य क्षेत्रातील Banking, finance, securities, MBA- Finance, Supply Chain Management, विविध क्षेत्रातल्या Research & Development ह्या सारख्या ला Commerce अग्रगण्य महत्व देणार्या क्षेत्रांमध्ये करिअर करण्यासाठी तयार करणे हा आहे.
आपला स्नेहांकित ,
अध्यक्ष
श्री. राजेश म्हात्रे, B.E., MBA
देवांशी फॉउंडेशन, पनवेल,
Reg. No.. इ - १५०९ , रायगड , महाराष्ट्र, फोन : 9702687582
Email : Info@devanshifoundation.com